मुंबईबाबत सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात असताना BMC आयुक्तांनी दिला मोठा दिलासा

मुंबईबाबत सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात असताना BMC आयुक्तांनी दिला मोठा दिलासा

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना धीर देत एक आवाहन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : राज्याची राजधानी असलेली मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतरही मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मात्र अशा स्थितीतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना धीर देत एक आवाहन केलं आहे.

'मुंबईकराना विनंती आहे की आपण एवढी दिवस मेहनत घेतली आहे. आता आणखी काही दिवस घरी राहा. हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला नक्की यश मिळेल,' असं सांगत इकबाल चहल यांनी मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी आज सायन रुग्णालयाची पाहणी केली. 'हे रुग्णालय आमच्यासाठी महत्वाचं आहे. येथील आयसीयू , कोव्हिड वॉर्डचीही त्यांनी केली. तसंच यावेळी चहल यांनी थेट रुग्ण, आरोग्य सेवक यांच्या अडचणी जाणून घेत धीर दिला.

कंटेन्टमेंट झोनमध्ये उचलली कडक पाऊलं

'मुंबईत रुग्णालयात जेवढे आयसीयू आहेत तेथे सीसीटीव्ही लावणार आहोत. कंट्रोल रूममधील देखरेख ठेवली जाणार आहे. आपला रुग्ण वाढीचा रेट हा 14.5 आला आहे. केंद्र सरकारचे सर्व नियम आम्ही पाळत आहोत. 7 दिवसात निगेटिव्ह रिपोर्ट आला तर आता आपण रुग्णांना डिस्चार्ज देणार आहेत. त्यामुळे रुग्णालयात बेड उपलब्ध होतील. आता आपण कंटेन्मेंट झोन मध्ये कडक पावलं उचलली आहेत,' अशी माहिती इकबाल चहल यांनी दिली.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 17, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या