• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'Coronaच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर पहिल्यापेक्षा कमीच', महापौरांनी केलं वॉररूमचं कौतुक

'Coronaच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर पहिल्यापेक्षा कमीच', महापौरांनी केलं वॉररूमचं कौतुक

Mumbai corona deathrate दुसऱ्या लाटेत मृत्यूदर पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 • Share this:
  मुंबई, 05 मे : सध्या देशभरात आणि राज्यातही घुमाकूळ घालत असलेली कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट (corona second wave) अत्यंत भयंकर आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण (death rate) कमी असल्याचं, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. मुंबईत वॉर रूम (war room) सुरू करून कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ हळू हळू कमी होत असल्याचं पाहयाला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या कमी होण्यामागे कोरोनाचा घटलेला पॉझिटिव्हिटी रेट हेदेखिल मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळंच कोरोनाची मुंबईतली रुग्णसंख्या 11 हजारावरून आता 3 हजारांच्याही आत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत माहिती देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, मुंबईत आम्ही वॉर रूम तयार करून संपूर्ण नियोजन केलं. कोरोनाच्या संपूर्ण स्थितीवर या वॉररूम मधून नियंत्रण ठेवलं जात होते. लोकांना आम्ही बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती देत होतो. त्यामुळं या वॉर रूमच्या मदतीनं या संकटाचा सामना करणं सोपं गेल्याचं पेडणेकर म्हणाल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी मृत्यूदर कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं. (हे वाचा-आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती, आरोग्य मंत्र्यांची माहिती) कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती हाताळण्यात मुंबईने ज्या पद्धतीनं काम केलं त्याचं सर्वोच्च न्यायालयानंही कौतुक केलं आहे. मुंबईत प्रामुख्यानं टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार या मुलभूत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. शॉपिंग मॉल, भाजी बाजार, फिश मार्केटस यासारख्या गर्दीच्या ठिकाणी आम्ही स्वॅब कलेक्शनसाठी (Swab Collection) सेंटर्स सुरू करण्यात आले. (हे वाचा-खेडेगावातील उद्योजकानं तयार केलं Ventilator;अर्ध्या किमतीत मिळणार, मिळाली मंजुरी) मुंबईत ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) प्रणालीत वाढ केली. 28,000 बेड्सपैकी सुमारे 12 ते 13 हजार बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळं ही गरज लक्षात घेता 13 हजार किलोलीटर क्षमतेची द्रव वैद्यकीय ऑक्सिजन टाकी उभारली. ज्या ठिकाणी अधिक बेडस आहेत तिथं 2 जंबो सिलेंडर तैनात करण्यात आले. त्याचबरोबर  डोअर-टू-डोअर सर्व्हे, इन्फ्लुएंझा किंवा कोरोनाची लक्षणं ओळखण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यक्तीची नेमणूक केली. या सर्व घटकांनी आपापल्या परीने जबाबदारी पार पाडली त्याचा परिणाम मुंबईत सकारात्मक झाला. कोरोनाच्या या संकटामध्ये त्वरित सुविधांची गरज भासते. त्यामुळं तात्पुरत्या सुविधा असलेले सेटअप उभारणं गरजेचं होतं. मुंबईत त्यावर भर देण्यात आला. संपूर्ण राज्यात या पद्धतीनं काम झाल्यास कोरोनाच्या या संकटाला अधिक मजबुतीनं सामोरं जाता येणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: