मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोनाची लाट ओसरली, दिलासादायक आकडेवारी समोर

मुंबईत कोरोनाची लाट ओसरली, दिलासादायक आकडेवारी समोर

4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर आज 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे.

4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर आज 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे.

4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर आज 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 एप्रिल : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) नगरीला कोरोनाने (Corona) विळखा घातला आहे. पण, आता मुंबईनगरीत दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) संख्या कमी होत चालली आहे.

मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील 4 तारखेपासून ते आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी दिली आहे.  4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर आज 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 5542 वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चिन्ह आहे.

शास्त्रीय संगीतातील तारा निखळला, पद्म भूषण पंडित राजन मिश्रा यांचं कोरोनाने निधन

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या ही वाढत गेली होती. 15 तारखेनंतर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी ही ओसरत गेली. अखेरीस याचा फायदा आता समोर दिसत आहे.

मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या

4 एप्रिल : 11163

7 एप्रिल: 10428

9 एप्रिल: 9200

11 एप्रिल: 9000

13 एप्रिल : 7898

15 एप्रिल: 8217

16 एप्रिल: 8839

18 एप्रिल: 8400

19 एप्रिल: 7381

20 एप्रिल: 7214

21 एप्रिल: 7684

22 एप्रिल: 7410

23 एप्रिल: 7221  

24 एप्रिल: 5888

25 एप्रिल : 5542

राज्यात बरे होण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान, राज्य सरकारकडून गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

गेल्या 24 तासांत 61,450 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 35,30,060 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.19 एवढे झाले आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला आणखी एक परदेशी खेळाडू

आज राज्यात 66, 191 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 832 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे. राज्यात 42,36,825 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 29,966 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 6,98,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

First published: