Home /News /mumbai /

चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली

मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या (Mumbai Corona Cases) चक्क दुपटीने वाढली आहे. कोरोना विषाणू हा गुणाकार करतो. एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली तर ती दुप्पट किंवा तीनपटीने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही चिंतेची बाब आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 डिसेंबर : मुंबई, पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची (Corona Cases) संख्या कमी झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त केलं जात होतं. विशेष म्हणजे कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यामुळे लोकल ट्रेनपासून (Local Train) अनेक गोष्टी अनलॉक (Unlock) झाल्या आहेत. अनेकांना पुन्हा एकदा आपापले उद्योगधंदे सुरु करता आले आहेत. पण हे संकट अद्यापही टळलेलं नाही. कारण कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने जगभरात चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचं अद्यापही थैमान सुरुच आहे. विशेष म्हणजे मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या चक्क दुपटीने वाढली आहे. कोरोना विषाणू हा गुणाकार करतो. एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली तर ती दुप्पट किंवा तीनपटीने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. मुंबईत दिवसभरात 602 नवे कोरोनाबाधित मुंबईत आज 602 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काल (22 डिसेंबर) हीच संख्या 490 इतकी होती. त्याआधी हीच संख्या 327 इतकी होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज आता वाढताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 2813 इतकी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा 1747 इतका आहे. मुंबईतील गेल्या आठ दिवसांमधील नव्या कोरोनाबाधितांची संख्या : 23 डिसेंबर : 602 22 डिसेंबर : 490 21 डिसेंबर : 327 20 डिसेंबर : 204 19 डिसेंबर : 336 18 डिसेंबर : 283 17 डिसेंबर : 295 16 डिसेंबर : 279 15 डिसेंबर : 238 14 डिसेंबर : 225 13 डिसेंबर : 174 हेही वाचा : बायकोच्या महाभयंकर आजाराबाबत समजताच नवरा हादरला; उचललं टोकाचं पाऊल ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राज्यांना सूचना जगभरात थैमान घालणारा कोरोनाचा ओमायक्रोन या विषाणूचा संसर्ग भारतातही शेफारत आहे. देशातील तब्बल 16 राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार देशात 269 जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे संभाव्य भीतीचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज आढावा बैठक आयोजित केली होती. केंद्र सरकारने ओमायक्रोनला रोखण्यासाठी सर्व राज्यांना नाईट कर्फ्यूपासून ते सणांवर बंदी घालण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या