S M L

होय, 'मी आईला मारलं!', पीआय ज्ञानेश्वर गणोरेंच्या मुलाची कबुली

दीपालींच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांत याला जोधपूरमध्ये अटक करण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: May 25, 2017 07:27 PM IST

होय, 'मी आईला मारलं!', पीआय ज्ञानेश्वर गणोरेंच्या मुलाची कबुली

25 मे : मुंबईतल्या पीआय ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली गणोरेंच्या हत्येचं  गुढ अखेर उकललंय. मुलगा सिद्धांतच आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिलीये.

दीपालींच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांत याला जोधपूरमध्ये अटक करण्यात आलीये. दीपालींच्या हत्येनंतर सिद्धांत गायब होता. पोलिसांनी जोधपूर रेल्वे स्टेशनजवळच्या एका हॉटेलमधून त्याला अटक केलीये.

दीपाली आणि ज्ञानेश्वर सतत भांडायचे, शिवाय दीपाली त्याला वाईट वागणूक देत असल्याचं सिद्धांतचं म्हणणं आहे. मंगळवारी दीपाली यांनी सिद्धांतजवळ त्याचं प्रगती पुस्तक मागितलं. सिद्धांतनं परीक्षाच दिली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडं प्रगती पुस्तकच नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सिद्धांतनं दीपालीची हत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2017 07:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close