'जीवाची मुंबई' करणाऱ्यांसाठी मुंबापुरी महागच !

जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७ वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा ८२ वा क्रमांक होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2017 11:27 PM IST

'जीवाची मुंबई' करणाऱ्यांसाठी मुंबापुरी महागच !

22 जून : मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. मर्सर या संस्थेने आपल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब नोंद केलीये.

जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७ वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा ८२ वा क्रमांक होता. मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते.

यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे.

भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे. या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे. तर चेन्नई १३५, बंगळूरु १६६, कोलकाता १८४ या शहरांचाही समावेश आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 11:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...