मुंबईत काँग्रेसचे पाच उमेदवार ठरले, ही आहेत संभाव्य नावं!

मुंबईत काँग्रेसचे पाच उमेदवार ठरले, ही आहेत संभाव्य नावं!

' सर्व जागांसाठी फार वाद नसल्याने सर्व उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत.'

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 14 जानेवारी : काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुंबईतील पाच जागांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या सर्व जागांवरचे उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतल्या एकूण 6 जागांपैकी पाच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

मुंबईत  लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी सोमवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण, संजय निरुपम यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येत मतदारसंघातल्या निवडक नावांवर चर्चा करण्यात आली. सर्व जागांसाठी फार वाद नसल्याने सर्व उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. ही सर्व नावं अंतिम मान्यतेसाठी दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे आहेत संभाव्य उमेदवार

दक्षिण मुंबई  - मिलिंद देवरा

दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त यांच्या जागेवर अभिनेत्री नगमा यांनी  दावेदार सांगितली.

उत्तर मुंबई - कृपाशंकर सिंह हे मुख्य दावेदार आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई  - संजय निरुपम यांनी इच्छा व्यक्ती केली.

आघाडी च जागावाटप दोन दिवसात निश्चित होईल त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जाते. काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून उमेदवार निवडीसाठी अडचण येणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय.

दक्षिण मुंबईतून सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिर्घकाळ भूषवलं होत. त्यामुळं त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मिलिंद देवरा यांच्याशिवाय अन्य कुणाचं नाव पुढे न आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

त्याच बरोबर दक्षिण मध्य मुंबईतून काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचं नावही निश्चित मानलं जात आहे. या सर्व नावांची शिफारस राज्याची समिती ही केंद्राकडे पाठवते आणि त्यानंतर निर्णय जाहीर केल जातो.

मिलिंद देवरा ह काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अंतरंग वर्तुळातले असून विश्वासू सहकारी समजले जातात.

राहुल यांच्या विदेश दौऱ्यांच्या नियोजनातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेही त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता कमीच आहे.

Special Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ?

First published: January 14, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading