मुंबई काँग्रेसमधील धुसफुस दिल्ली दरबारी; संजय निरूपमांवर हायकमांड नाराज !

मुंबई काँग्रेसमधील धुसफुस दिल्ली दरबारी; संजय निरूपमांवर हायकमांड नाराज !

Mumbai Congressमधील अंतर्गत वाद आजा चव्हाट्यावर आले असून त्याची दखल दिल्लीमध्ये घेतली गेली आहे.

  • Share this:

मुंबई, सागर कुलकर्णी, 09 जुलै : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देखील मुंबई काँग्रेसमधील नाराजी अद्यापही कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम विरूद्ध मिलिंद देवरांमधील वाद आता सार्वजनिक झाला असून त्याची दखल आता दिल्ली दरबारी देखील घेतली गेली आहे. संजय निरूपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर ट्विटरवरून नाव न घेता टीका केली होती. यामध्ये त्यांनी उर्मिला मातोंडकर यांनी 16 मे रोजी मिलिंद देवरांनी लिहिंलेलं पत्र प्रसार माध्यमांना दिलं गेलं. ते आपले मार्गदर्शक जेटलींकडून शिकले का? असा सवाल केला होता. त्यावर भाई जगताप यांनी देखीव नाराजी व्यक्त केली होती. या साऱ्याची दखल आता दिल्लीत घेतली असून संजय निरूपम यांना दिल्लीला बोलावून घेतलं गेलं आहे. यावेळी त्यांना समज दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा !

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरूपम यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची धुरा काढून घेत मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आली. पण, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांना पत्र लिहत काँग्रेस नेत्यांनी मदत न केल्याची तक्रार केली. हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील सर्व गोष्टी समोर आल्या. या साऱ्याची दखल आता दिल्लीमध्ये घेण्यात आली आहे.

VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

First published: July 9, 2019, 12:25 PM IST

ताज्या बातम्या