संजय निरुपमांसाठी धोक्याची घंटा, राहुल गांधी लवकरच घेऊ शकतात मोठा निर्णय

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद संजय निरूपम यांच्याकडून काढून घ्या, अशी मागणी करत काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 11:33 AM IST

संजय निरुपमांसाठी धोक्याची घंटा, राहुल गांधी लवकरच घेऊ शकतात मोठा निर्णय

मुंबई, 21 डिसेंबर : मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद संजय निरूपम यांच्याकडून काढून घ्या, अशी मागणी करत काँग्रेसचे अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. नसीम खान, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर मुंबईतील इतर काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली आहे.

'निरूपम यांना हटवा आणि काँग्रेस मजबूत करा. त्यांच्याजागी मिलींद देवरा यांना अध्यक्ष करा,' अशी मागणी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून मुंबई काँग्रेसमध्ये निरूपम यांच्याविषयी असलेली प्रचंड नाराजी दिसून येते.

'जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ'

मुंबई काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या भेटीनंतर हायकमांडकडून त्यांना आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत जानेवारी महिन्यात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं आश्वासन या नेत्यांना मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे निरुपमांबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसच्या भांडणाचा इतिहास

Loading...

मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. मुरली देवरा, गुरूदास कामत यांना मानणारे गट, एकनाथ गायकवाड, कुपाशंकर सिंग, प्रिया दत्त, संजय निरूपम अशा अनेक गटात मुंबई काँग्रेस विभागाली आहे. एकेकाळी ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचं मुंबई काँग्रेसवर एकहाती वर्चस्व होतं. देवरा यांनी तब्बल 22 वर्ष मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास आणि उद्योगपतींशी असलेली जवळीक यामुळं त्यांना कुणी हात लावू शकलं नाही.

1981 ते 2003 असं दोन दशकांपेक्षा जास्त काळ ते या पदावर होते. काँग्रेसला रसदपुरवढा मुंबईतूनच होत असल्याने देवरांचं महत्व कायम राहिलं. नंतर गुरूदास कामत यांच्याकडे पक्षानं मुंबई काँग्रेसची धुरा दिली. त्यावेळी देवरा यांच्या समर्थकांनी कामत यांच्याविरूद्ध आघाडी पुकारली.नंतर कृपाशंकर सिंग यांच्याकडे धुरा आली. पक्षांतर्गत राजकारणापेक्षा भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोपांमुळेच कृपाशंकर सिंग यांना जावं लागलं. जर्नादन चांदुरकर हे फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. नंतर फायरब्रॅण्ड नेते संजय निरूपम यांच्याकडे राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सोपवली.

निरूपमांना सर्वांचा विरोध

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले निरूपम हे कधीच पक्षात एकरूप होऊ शकले नाहीत आणि इतर नेत्यांनीही त्यांना कधी आपलसं केलं नाही. याला कारण निरूपम यांची कार्यशैली असल्याचंही बोललं जात. राहुल गांधींचा विश्वास ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतलय. निरूपम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं, आंदोलनं केलीत मात्र त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक कधीच झाली नाही.

केवळ उत्तर भारतीयांचे नेते याच भूमिकेतून त्यांच्याकडे कायम पाहिलं गेलं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम उत्तर भारतीय नेत्यांची वर्णी लावली जाते हा काँग्रेसवर कायम आरोप केला जातो. त्याचं कारण म्हणजे मुंबईत असलेली उत्तर भारतीय मतदारांची संख्या हेच आहे.

फायदा कुणाचा होणार?

त्यामुळं आपली लॉबी आणखी घट्ट करण्याचा संजय निरूपम यांचा कायम प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी इतर सर्व गट मतभेद विसरून एकत्र आले आहेत. काहीही केलं तरी इतर नेते आपल्याला स्वीकारणार नाहीत याची जाणीव संजय निरूपम यांना आहे.

त्यामुळे आपला गट मजबूत करण्याकडे त्यांचा कायम कल असतो. त्यामुळेच त्यांच्यावर एकाधिकारशाही आणि मनमानी करण्याचे आरोप होताहेत. सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका, भाजप, शिवसेनेचं मुंबईत असलेलं मोठं आव्हान असं असताना मुंबई काँग्रेस मात्र भांडणात गुंतलेली आहे. भडक वक्तव्य करून वाद निर्माण करणं हे निरूपम यांच्या फायद्याचच ठरणार असून त्यामुळं उत्तर भारतीयांमधलं त्याचं स्थान आणखी पक्क होण्यास मदत होणार आहे.


VIDEO : राज ठाकरेंचा साधेपणा, कार्यकर्त्याच्या घरी केलं जेवण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...