मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, भाई जगताप- झिशान सिद्दीकीमधला वाद पेटला

मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, भाई जगताप- झिशान सिद्दीकीमधला वाद पेटला

मुंबई काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 17 नोव्हेंबर: मुंबई काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)आणि शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सिद्दीकी यांनी जगताप यांच्यावर अपमानास्पद वागणूक आणि अन्यायाचा आरोप केला असून कारवाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे, जगताप यांच्या निकटवर्तीयांनी सिद्दीकी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी निकटवर्तीयांनी म्हटलं की, वांद्रे (पूर्व) च्या आमदाराने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गैरवर्तन आणि अनुशासनहीन कृत्य केले ज्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

हेही वाचा- पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, CRPF च्या जवानांवर फेकले ग्रेनेड 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत जगताप आणि सिद्दीकी यांच्यातील वाद सुरू झाला. राजगृह (बीआर आंबेडकरांचे निवासस्थान) येथे झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते आणि ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आत जाऊ दिले नाही, असा दावा सिद्दीकी यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात झिशान यांनी असाही दावा केला आहे की, जगताप यांनी मला धक्काबुक्कीही केली आणि माझ्या समुदायाविरुद्ध "अपमानास्पद शब्द" वापरले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी झिशान यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा- BREAKING: कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश

त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, बैठकीतून बाहेर काढण्यावर नेत्यांनी म्हटलं की, जगताप यांनी मला सर्वांसमोर अशी वागणूक द्यायला नको होती...भाई जगताप यांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्याबद्दल आणि माझ्या समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलले.

सिद्दीकी यांनी दावा केला की, भाई जगताप यांनी माझ्यावर सातत्याने अन्याय केला आहे. मी जन्मापासूनच खरा काँग्रेसी आहे... माझा तुमच्यावर (सोनिया) विश्वास आहे की तुम्ही कठोर कारवाई कराल.

जगताप यांच्या जवळच्या एका नेत्याने झिशान यांच्या दाव्याचं खंडन केलं आहे आणि सांगितले की, "भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मुंबईत पुन्हा काँग्रेसला नंबर वन पक्ष बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण काही लोक पैशाच्या अहंकारात काँग्रेसचे नुकसान करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

हेही वाचा- नगर हादरलं! सख्खे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले; एकाने पाइपनं केला वार तर दुसऱ्यानं झाडली गोळी 

पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका होत असताना काँग्रेसच्या मुंबई युनिटमधल्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. एकेकाळी मुंबईच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसकडे सध्या महाराष्ट्र विधानसभेत शहरातून केवळ चार आमदार आहेत. बीएमसीमध्येही काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

First published:

Tags: Sonia gandhi, काँग्रेस