LIVE: अजित पवार सोबत नाहीत, आमच्याकडे संख्याबळ नाही- देवेंद्र फडणवीस

LIVE: अजित पवार सोबत नाहीत, आमच्याकडे संख्याबळ नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर: अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सरकार स्थापन केले होते. पण त्यांनीच आता राजीनामा दिल्यामुळे आम्ही देखील राजीनामा देत आहोत असे सांगित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. राज्यात आम्ही चांगले सरकार देण्याचा प्रयत्न केला. पण सर्व विरोध भाजप हटाव यासाठी एकत्र आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. या वृत्ताला मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. अजित पवार यांनी राजीनामा दिला असून त्यामुळे आता आमच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर मी राज्यपालांकडे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

LIVE अपडेट-

- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिलं

- भाजपला संपूर्ण जनादेश देत 105 जागा दिल्या

- शिवसेनेसोबत लढलो, पण हा जनादेश फक्त भाजपला होता कारण आम्ही जास्त जागा जिंकल्या आहेत

- महायुतीला जनादेश होता पण भाजपला जास्त होता

- याचा सन्मान करण्यासाठी आम्ही सरकार स्थानप करण्याचा प्रयत्न केला,

- नंबरचा गेम शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बार्गिनिंग सुरू केलं

- जी गोष्ट कधीही ठरली नव्हती ते म्हणजे मुख्यमंत्रीपद मागण्यास सुरुवात केली

- प्रत्येक इंटरव्हूमध्ये त्यांनी न ठरलेल्या बाबींवर भाजपला धमकी दिली

- आमची ठरलेलं देण्यासाठी तयार होतो. पण त्यांनी विरोधकांसोबत जाण्याचा निर्णय घेतला

- आम्हाला राज्यपालांनी बोलावलं पण आमच्यासोबत शिवसेना नव्हती. त्यामुळे आम्ही आकडा नाही सांगून परत आलो

- शिवसेनेसह , राष्ट्रवादी, काँग्रेसलाही बोलावलं पण अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली

- त्यानंतर 15 दिवस हालचाली सुरू होत्या. पण वेगळ्या विचारांचे हे तीन पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही

- ते कॉमन मिनिमन प्रोग्राम नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम करत होते.

- अजित पवार यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी सहकार्य करायचं ठरवलं

- आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला पत्र दिलं. ते राज्यपालांना सादर करत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

- पण त्यानंतर अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही

- मी राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहे.

- आम्ही कोणाचे आमदार तोडणार नाही, आम्ही फोडाफोडी करणार नाही

- शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते शिवसेनेत्या नेत्यांनी सत्तेसाठी लाचारी स्वीकारली

-सोनिया गांधींची शपथ घेणे ही शिवसेनेच्या नेत्यांची लाचारी

- भाजप हटाव हा नारा घेऊन सर्व जण एकत्र आले

- पत्रकार परिषदेनंतर राजीनामा देणार

- अजित पवारांनी पाठिंबा दिला म्हणून सरकार स्थापन केले

- अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

- शिवसेनेने भाजपला धमकी दिली

- जी गोष्ट कधीच ठरली नव्हती त्याची मागणी शिवसेनेने केली

- नंबर गेममध्ये स्वत:चे मुल्य वाढवले

Published by: Akshay Shitole
First published: November 26, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading