विमान अपहरणाच्या धमकीनंतर मुंबई, चेन्नई, हैदराबाद विमानतळांवर हायअलर्ट जारी

विमान अपहरणाच्या धमकीनंतर मुंबई, चेन्नई, हैदराबाद विमानतळांवर हायअलर्ट जारी

  • Share this:

16  एप्रिल : मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचं एकाचवेळी अपहरण केलं जाणार असल्याची खबर विमानतळ सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या माहितीमुळे तिन्ही विमानतळ परिसर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार 23 जणांची टीम हे अपहरण करणार अस

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी या तीन विमानतळांवर हाय अलर्ट जारी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुंबई पोलीस उपायुक्तांना एका महिलेकडून ईमेल आला. या ईमेलमध्ये एकाच वेळी मुंबई, चेन्नई आणि हैदराबाब विमानतळावर विमानांचे अपहरण करण्याचा कट शिजवला जात असल्याचं तिने म्हटलं. 6 मुलांना यासंबंधी कट शिजवताना ऐकलं असं त्या महिलेने मेलमध्ये म्हटलं आहे. तो मेल फसवणूक करणाराही असू शकतो पण खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली.

विमान अपहरणाच्या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्थेत  मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसंच, या तिन्ही विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे आता सुरक्षेच्या घेऱ्यामुळे वेळेच्या खूप अगोदर चेक-इन करावं लागणार आहे.

ई-मेलचा तपशील :

- मेल कधी मिळाला : शनिवार 15 एप्रिल, दुपारी 2.47 वा.

- ई-मेल आयडी : unknown08@gmail.com

- एका महिलेनं पाठवला ई-मेल

- ई-मेलमध्ये काय लिहिलं होतं?

- हैदराबादमध्ये काही तरुणांना बोलताना ऐकलं. ते म्हणत होते, आम्ही 23 जण आहोत. मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईहून विमानाचं अपहरण करायचं आहे. हे काम आम्ही सहज करू शकतो.

- माझा तपास करू नका, मेल पाठवणाऱ्या महिलेचा सल्ला

First published: April 16, 2017, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading