ठाणे, 14 फेब्रुवारी : मध्य रेल्वेची (Central Railway) सेवा शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा खोळंबली. रेल्वे रुळांलगतचा कचरा पेटल्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली. कळवा स्टेशनजवळ रेल्वे रुळांच्या अगदी लगत असणाऱ्या कचऱ्याला आग लागली. धुराचे लोट रेल्वेमार्गावर दिसत होते. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी तातडीने रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ठाण्याचं आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं.
आग फारशी मोठी नव्हती. त्यामुळे फारशी वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नाही. पण या आगीमुळे मोठे धुराचे लोट उठले होते. रेल्वेरुळांवरची दृश्यमानताही यामुळे प्रभावित झाली. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या लोकल उशीराने धावत होत्या. कार्यालयं सुटण्याच्या वेळेतच हा प्रकार झाल्याने लोकल खोळंबा झाला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळीच