सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे : मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतूक तब्बल 45 मिनिटं उशिरानं सुरू आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर  प्रचंड गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवर दररोज कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे खोळंबा होत असल्यानं प्रवासी हैराण झाले आहेत. मध्य रेल्वेच्या रोजच्या रडखडीबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

पाहा :VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचं आंदोलन

कुर्ला-विद्याविहारदरम्यान रूळावरून घसरलं लोकलचं चाक 

यापूर्वी रविवारीदेखील (26 मे) मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचं चाक घसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल विद्याविहार-कुर्ला स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. यामुळे खोळंबा झाला होता.

पाहा :गिरीश महाजन यांनी राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत दिली माहिती, पाहा VIDEO

यादरम्यान, लोकल रुळावरून घसरण्यापूर्वीच महिलांच्या डब्यात शॉर्ट सर्किट होऊन धूरदेखील येऊ लागला होता. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या गोंधळामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं.

VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?

First published: May 28, 2019, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading