"घाबरलेल्या सेलिब्रेटींमुळे सर्वसामान्यांना मुंबईत बेड्स मिळत नाहीत"

Aslam Shaikh on Maharashtra lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : महाराराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) हा खूपच वेगाने होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स सुद्धा मिळत नाहीयेत. याच संदर्भात राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी म्हटलं, कोरोनामुळे सेलिब्रेटी (Celebrity) घाबरुन रुग्णालयात दाखल होतात आणि त्यामुळे बेड्स सर्वसामान्य नागरिकांनाही बेड्स मिळण्यात अडचणी येत आहेत.

अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आज तुम्ही बघा ना, आज मोठ-मोठे अभिनेते आहेत ते सुद्धा घाबरले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षण कमी असतात आणि त्यांना सांगितलं की, तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाहीये. तरीही मोठे सेलिब्रेटी, खेळाडू बेड्स बळकावतात आणि ज्या नागरिकांना खरोखरच बेडची गरज आहे त्यांना ते मिळत नाहीत"

... तर गरजूंना बेड्स मिळतील

अस्लम शेख यांनी पुढे म्हटलं, जर या सेलिब्रेटी, खेळाडूंनी कमी लक्षण असताना रुग्णालयात दाखल होण्याचं टाळलं तर राज्यातील गरजू आणि ज्यांना आवश्यक आहे अशा रुग्णांना ते बेड्स उपलब्ध होतील.

हे पण पाहा: गावी परतणाऱ्या मजुरांची कुर्ला स्टेशनवर तोबा गर्दी, लॉकडाऊनच्या भीतीने धरली परतीची वाट

तीन जम्बो हॉस्पिटल उपलब्ध होणार

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्र सरकार उपचारांसोबतच बेड्सची क्षमता देखील वाढविण्याचे काम करत आहे. येत्या पाच ते सहा आठवड्यांत मुंबईत तीन जम्बो हॉस्पिटल सुरू केले जातील.

कुठल्याही क्षणी लॉकडाऊन

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असतानाही कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.. यामुळेच आता राज्यात 15 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लावण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. या संदर्भात अस्लम शेख यांनी म्हटलं, लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आज अंतिम निर्णय जाहीर करु शकतात.

First published: April 13, 2021, 4:51 PM IST

ताज्या बातम्या