हे वाचा-पुण्यात कोविड सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO 3 वर्षांच्या चिमुकला रस्त्यावर खेळत असताना अचानक मागून कार आली. अंगावर कार येत असल्याचं पाहून चिमुकला घाबरला आणि गोंधळून गेला. भरधाव कारचे टायर त्याच्या अंगावरून गेले. या घटनेमध्ये चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले. कार अंगावरून गेल्यामुळे यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं कार चालकाचा शोध सुरू आहे. कार चालकानं मुलाला चिरडल्यानंतर साधे औदार्य दाखवले नाही. तर पकडले जावू या भीतीनं त्यानं पळ काढला असून मालवणी पोलीस सध्या या कार चालकाचा तपास करत आहेत.मुंबई उपनगरातील धक्कादायक VIDEO, खेळत असलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली कार pic.twitter.com/PlJS7TJXSg
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) September 16, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.