आईच्या चुकीमुळे गेला 6 महिन्यांच्या मुलीचा जीव, मुंबईत कार अपघातात 3 जणांचा मृत्यू

कार चालक महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कार चालक महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 मार्च : भरधाव कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील वरळी परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक महिला या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्युमुखी झालेल्यांमध्ये 6 महिन्यांचा मुलीचाही समावेश आहे. आई, नात आणि नातेवाईक असे तीन गाडीत कार चालकाव्यतिरिक्त होते. हे वाचा-बाप रे! एकाच वेळी शेतात आढळले 6 भलेमोठे अजगर, शेतकऱ्यांमध्ये भीती मिळालेल्या माहितीनुसार महिलेची अवस्था गंभीर आहे. कार चालक असलेली महिला अंधेरीतील रहिवासी आहे. गाडीचा वेग जास्त होता. भरधाव कार थेट दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चुराडा झाला आणि गाडी असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कार चालक महिला गंभीर जखमी झाली. कारचा वेग जास्त होता आणि गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली तर स्पीड ब्रेकरवर नियंत्रण न मिळवता आल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा-FACT CHECK: कोरोनामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रात जाहीर केली सुट्टी?
    First published: