Home /News /mumbai /

मुंबईत भरधाव कार रस्त्यातच पलटली, अपघातानंतर घडला विचित्र प्रकार

मुंबईत भरधाव कार रस्त्यातच पलटली, अपघातानंतर घडला विचित्र प्रकार

या अपघातानंतर एक विचित्रच प्रकार घडल्याचंही पाहायला मिळालं.

मुंबई, 24 जून : भरधाव वेगात जाणारी कार रस्त्यावर उलटल्याची घटना मुंबईत आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर उलटली असून ही गाडी जोगेश्वरीहून मुलंडला जाणार होती, अशी माहिती आहे. या अपघातानंतर एक विचित्रच प्रकार घडल्याचंही पाहायला मिळालं. कारने पवईतील आयआयटीचं गेट ओलांडलं आणि वळणावर चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि कार अक्षरशः उलटली. या कारमध्ये अजून एक महिला बसली होती. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. हेही वाचा - डबल धमाका, कोरोनाबाबत मुंबईसह राज्यभरातून आली आनंदाची बातमी ऐन संध्याकाळी ही कार उलटल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती, पण वेळेवर वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी कार बाजूला केली असून वाहतूक सुरळीत करीत आहेत. अपघातानंतर विचित्र प्रकार पोलिसांना या कारमध्ये काही दारूच्या बाटल्या मिळाल्या असून त्या जप्त केल्या आहेत. तर चालक नशेत कार चालवत होता, त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेलं असता तो त्या ठिकाणाहून पळून गेला आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

First published:

Tags: Mumbai accident, Mumbai news

पुढील बातम्या