VIDEO : धक्कादायक! मुंबईत भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

VIDEO : धक्कादायक! मुंबईत भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : चेंबूर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला आहे. सुसाट वेगात असणारी भरधाव कार डिव्हायडरवर आदळल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात मुंबईतील चेंबूर परिसरात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांना अपघताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहाणी केली.

या अपघाताची भीषणता दाखवणारे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या कारचा वेग खूप जास्त होता आणि अचानक कार डिव्हायडरवर आदळल्यानं पुढच्या काचा फुटल्या आणि टायर आणि बोनेटचंही मोठं नुकसान झालं. या कारची अवस्था पाहून हा अपघात किती भयंकर असेल याचा अंदाज येऊ शकतो. सायन-चेंबूर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-एका पैजेपायी अख्ख्या आयुष्याच युद्ध हरला तरुण; जागीच सोडला जीव

भरधाव वेगात असणारी कार थेट डिव्हायडरवर आदळली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं की चालक नशेत असल्यानं हा अपघात झाला याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे तर प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून सध्या या अपघाताप्रकरणी तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 19, 2020, 8:02 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading