भरधाव कारने 6 जणांना चिरडणाऱ्या आरोपीला अटक

भरधाव कारने 6 जणांना चिरडणाऱ्या आरोपीला अटक

शाहबाज हा इर्टिका कार चालवत होता. या अपघातात तो आणि त्याची पत्नीही जखमी झाली होती.

  • Share this:

मुंबई 10 जून : मुंबईतल्या शिवडी भागात रविवारी एका भरधाव कारने 6 लोकांना चिरडले होते. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गाडीचा चालक शाहबाज इलियासी याला अटक केलीय. इलियासी आणि त्याची बायको घटनेच्या वेळी कारमध्ये होते.

शाहबाज हा इर्टिका कार चालवत होता. या अपघातात तो आणि त्याची पत्नीही जखमी झाली होती. या प्रकरणी आर.के रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. चौकशीनंतर पोलिसांनी शाहबाजला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहबाज हा आपल्या पत्नीसह आपल्या कारने जात होता. गाडी चालवत असताना त्यांचं आपल्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कारने दिशा सोडून दुसरीकडे वळण घेतलं. कार बाजूच्या बस स्टॉपकडे वळली आणि बसची वाट पाहात उभ्या असलेल्या माणसांना कारने चिरडले.

जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

फुटपाथवर झोपलेल्या दोघांना चिरडलं

आणखी एका घटनेत रस्त्यावर झोपलेल्या तीन जणांना टँकरनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील विक्रोळी येथील ही दुर्घटना आहे.  कैलास कॉम्प्लेक्स टिम्बकटु हॉटेलजवळ पादचारी मार्गावर झोपलेल्या तीन जणांना टँकरने चिरडलं. हे तिघं जण साखर झोपेत असल्यानं आपल्यावर मृत्यू ओढावत आहे, हे त्यांना समजण्यापूर्वीच काळानं घाला घातला. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे या दोन महिलांचा नाहक बळी गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (8 जून) 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर पार्क करताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. याचवेळेस हा टँकर दुसऱ्या टँकरवर जाऊन आदळला. या घटनेत रस्त्यावर झोपलेली  हे तिघं जण टँकरखाली चिरडले गेले. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

First published: June 10, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading