शिवसेनेशिवाय मुंबई बंद होऊ शकते,हे आम्ही करून दाखवलं-संजय निरुपम

शिवसेना म्हणते बंद फसला, पण सेनाभवनासमोर दुकानं बंद होती हे शिवसेनेनं लक्षात घ्यावं

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2018 06:34 PM IST

शिवसेनेशिवाय मुंबई बंद होऊ शकते,हे आम्ही करून दाखवलं-संजय निरुपम

मुंबई, 10 सप्टेंबर : शिवसेनेशिवाय मुंबईत बंद होऊ शकतो हे आज दिसून आले. हिंसा शिवाय बंद आम्ही करून दाखवला असा टोला काँग्रेसचे मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरूपम यांनी लगावला. तसंच भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत ही चांगला प्रतिसाद मिळालाय अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. संध्याकाळी पाचनंतर बंद मागे घेतला अशी घोषणा चव्हाण यांनी केली.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज सोमवारी भारत बंद पुकारला होता. या बंदमध्ये देशभरातील 21 पक्ष विरोधी सहभागी झाले होते. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. या बंदबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेतली.

सरकार विरोधात फक्त शिवसेना बोलते, शिवसेना आज उघडी पडली आहे. शिवेसना पोस्टर लावलेत अच्छे दिनचे, मला सेनेला सांगायचे भाजप समवेत सेना ही तितकीच आजच्या स्थितीला जबाबदार आहे अशी टीका निरूपम यांनी केली.

तसंच शिवसेना म्हणते बंद फसला, पण सेनाभवन दादर येथे दुकानं बंद होती हे शिवसेनेनं लक्षात घ्यावं. मुळात शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. संजय राऊत आम्हाला सांगतात की, विरोधकांना आता जाग आली, पण मला राऊत यांना सांगायचे तुम्ही अजून झोपलेले आहेत अशी टीका निरुपम यांनी केली.

Loading...

भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय. मुंबईत ही चांगला प्रतिसाद मिळालाय. आम्ही रेल रोको केले, पोलिसांनी आम्हास ताब्यात घेतले. मुळात सरकार घाबरले, आमच्या आंदोलनावर दडपशाही केली अशी टीका चव्हाण यांनी केली.

काँग्रेस सर्व कार्यकर्ते, इतर सहकारी पक्ष ज्यांनी बंदला पाठिंबा दिला याच्यामुळ बंद यशस्वी झाला. विशेष म्हणजे व्यापारी स्वखुषीने या बंदमध्ये सहभागी झाले अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

बंद दरम्यान हिंसक घटना घडली नाही. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यानी अशी कोणतीही हिंसा केले नाही असा दावाही चव्हाण यांनी केला.

केंद्रीय मंत्री रवी प्रसाद यांनी स्पष्ट केले, पेट्रोल दर वाढ सरकारच्या हातात नाही असे सांगतात. मोदी हे सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहे. सामान्यांच्या समस्या प्रश्न मोदी सोडवू शकत नाही हे सिद्ध झाले अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...