मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोबाइलवर बोलत चालवत होता बाईक, शेजारील बसला धक्का लागला आणि मग...

मोबाइलवर बोलत चालवत होता बाईक, शेजारील बसला धक्का लागला आणि मग...

Bus driver beaten by bike rider in Mumbai: मुंबईत एका दुचाकीस्वाराची दादागिरी समोर आली आहे. त्याने एका बस चालकाला बेदम मारहाण केली आहे.

मुंबई, 6 जुलै : मुंबईतील बाईकस्वाराचा (Mumbai bike rider)  एक व्हिडीओ समोर आला आहे. आपली स्वत:ची चूक असतानाही त्याने बस चालकाला बेदम मारहाण (Bus driver beaten by youth) केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्व (Kandivali East) परिसरात ही घटना घडली आहे. या बाईकस्वाराने बसचालकाला बसमधून खाली खेचून मारहाण केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या बिग बाझारच्या समोर एक दुचाकीस्वार मोबाइलवर बोलत बाईक चालवत होता. त्यावेळी त्याच धक्का शेजारील बसला लागला. आपली स्वत:ची चूक असतानाही त्याने बस थांबवली आणि बस चालकासोबत वाद घालण्यास सुरूवात केली.

या बाईकस्वाराने केवळ बस चालकासोबत वादच घातला नाही तर बस चालकाला त्याच्या केबिनमधून बाहेर काढून मारहाण केली. या घटनेचा वएक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, बसमधील प्रवासी सुद्धा या दुचाकीस्वाराची चूक असल्याचं बोलत आहेत. तसेच त्याला ओरडतही आहेत.

औरंगाबादमध्ये तरुणाला विवस्त्र करुन मारहाण

एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai