मुंबईत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 8 जण जखमी

मुंबईत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू,  8 जण जखमी

जखमींवर शेजारी असणाऱ्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईतील गोरगावात दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

जखमींवर शेजारी असणाऱ्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या इमारतीचं बांधकाम कच्च्या स्वरूपाचं होतं, अशी माहिती आहे. त्यामुळे ही इमारत अनधिकृत असण्याचीही शक्यता आहे. पण अद्याप याबाबत प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, मुंबईत अशा इमारती कोसळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. अनधिकृतपणे इमारती उभारल्या जाणं हे यामागचं मुख्य कारण असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत काही उपाययोजना केल्या जातात का, हे पाहावं लागेल.

VIDEO : विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो -नितीन गडकरी

First published: December 23, 2018, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading