मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत (Mumbai) मंगळवारी रात्री तीन मजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना वांद्र्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची (Mumbai Building Collapsed) वाईट बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही आज संध्याकाळी जवळपास चार वाजता घडल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच सहा रुग्णवाहिका (ambulance) घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या घटनेत पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही वांद्र्याच्या बेहरामपाडा परिसरात घडली आहे. जी इमारत कोसळली आहे ती खूप जुनी होती. तसेच ती इमारत बेकायदेशीर होती. तिला मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते. संबंधित घटना घडली तेव्हा परिसरात मोठा आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. तसेच प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निमशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं. दुर्घटनेत बाधित असलेल्यांना बचावण्याचं युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
(मैदान नामकरणाचा वाद चिघळला, भाजपचे आमदार-खासदार घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?)
सहा जणांना ढिगाऱ्याखालून काढलं, बचावकार्य जारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाकडून प्रचंड वेगाने काम सुरु आहे. बचाव पथकाने आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशनमधून 6 जणांना बाहेर काढलं आहे. हे सहाही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले होते. ते दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या सहापैकी चार जखमींना व्ही एन देसाई आणि दोन जणांना वांद्र्याच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाचं काम सध्या सुरु आहे.
#WATCH | Visuals from the site of 5-storey building collapse in Behram Nagar locality of Bandra (East), Mumbai.
दरम्यान, मालाडच्या मालवणी परिसरात काल रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाराखाली 2-3 जण अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होती. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.