Home /News /mumbai /

Mumbai Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर, 13 जखमी; अनेकांचे संसार उघड्यावर

Mumbai Building Collapse: कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर, 13 जखमी; अनेकांचे संसार उघड्यावर

दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमी नागरिकांना 1 लाखांची मदत एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

    मुंबई, 28 जून : मुंबईतील कुर्ला येथे नाईक नगर भागात घडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली (building collapses in Mumbai kurla area) आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 10 वर पोहचली आहे तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींच्या मदतीला शिंदे गट धावून आला आहे. काल रात्री झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झला आहे. तर 4 जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, 9 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये 18 ते 36 वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. इमारत दुर्घटनेत अडकलेल्या काही लोकांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. अग्निशामक दल, महानगरपालिका व पोलिस यंत्रणा यांच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमी नागरिकांना 1 लाखांची मदत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या वतीने करण्यात येणार आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत आणि जखमींची नावे इमारत कोसळल्याची माहिती मिळताच आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच बचावकार्य आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, सर्व 4 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र असे असतानाही येथे लोक राहत होते. सर्वांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी आम्ही या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे काम करू. मुंबईत कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतींबाबत बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा जेव्हा बीएमसी जुन्या इमारतींबाबत नोटीस बजावेल तेव्हा त्या रिकाम्या कराव्यात. अन्यथा अशा घटना घडत राहतील, जे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai

    पुढील बातम्या