मुंबई, 18 मार्च: सीएसएमटीच्या रेल्वे स्थानकाजवळचा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी नीरजकुमार देसाई यांना अटक करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी रात्री पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जण ठार तर 34 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याप्रकरणी देसाई यांना पोलिसांनी अट केली.
नीरज देसाई हे देसाई डीडी देसाई कंपनीचे पार्टनर आहेत. कोसळलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट त्यांनीच केले होते. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल केला होता. देसाई यांनी उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. देसाई यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अभिषेक त्रिमुखे (डीसीपी), गुन्हे शाखा यांनी सांगितले. देसाई यांनी चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीएसएमटीकडून टाईम्स ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कोसळला. या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसएमटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या होत्या.
Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली