Home /News /mumbai /

BREAKING: मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

BREAKING: मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

मुंबईत गेल्या 2 आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे इमारत कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

    ज्योत्स्ना गंगणे, प्रतिनिधी मुंबई, 17 ऑगस्ट : मुंबईच्या वांद्रे परिसरात रिजवी कॉलेजजवळ इमारत कोसळ्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 4 मजली इमारतीचा काही भाग खाली कोसळला आहे. इमारत ही आधीपासून जीर्ण झाली होती. अशात मुंबईत गेल्या 2 आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे इमारत कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बांद्रेमध्ये इमारतीचा एक भाग कोसळल्यामुळे शेजारील अनेक घरं मलब्याखाली आली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच 10 फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारत आधीच जूनी होती त्यात पावसाच्या पाण्यामुळे ती आणखी जीर्ण झाली होती. अशात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. घटना घडल्यानंतर काही वेळ नागरिकांमध्ये धावपळ सुरू झाली तर परिसरात खळबळ उडाली आहे. इमारतीचा जो भाग इतर घरांवर पडला आहे तो बाजूला करण्याचं काम फायर ब्रिगेटकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मलब्याखाली कोणी अडकलं आहे का याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या