रिक्षात सापडली तान्हुली, तरुणाने टि्वट करून वाचवला जीव !

रिक्षात सापडली तान्हुली, तरुणाने टि्वट करून वाचवला जीव !

माणुसकीचं दर्शन घटवणाऱ्या अमनचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

  • Share this:

20 नोव्हेंबर :  मुंबईत एका आॅटो रिक्षामध्ये बेवारस सापडलेल्या तान्हुलीचा जीव एका टि्वटने वाचवलाय. ही तान्हुली एका तरुणाला सापडली. त्याने टि्वट केल्यानंतर या तान्हुलीला पुन्हा जीवदान मिळालं.

रविवारी पहाटे अमन नावाच्या या तरुणाला एका बंद रिक्षामध्ये 5 ते 6 दिवसांची तान्हुली सापडली. त्याने आधी पोलिसांशी संवाद साधला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने टि्वटरवर "मला एक 5 ते 6 दिवसांची मुलगी सापडली आहे काय करू ?" असं टि्वट केलं.

त्यानंतर टि्वटर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रिटि्वट करून मदतीचा प्रयत्न केला. तसंच त्याला पोलिसांकडे जाण्याचा सल्लाही दिला. अशातच एका वापरकर्त्याने मुंबई पोलिसांना त्यांचं टि्वट टॅग केलं. मुंबई पोलिसांनी पुढच्या क्षणाला या तरूणाची मदत करण्यासाठी धाव घेतली.

त्यानंतर अवघ्या काही तासानंतर अमनने  एका महिला काॅन्स्टेबलच्या हातात तान्हुली असलेला फोटो टि्वट केला. आता ही तान्हुली सुखरूप असून कांजुरमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे असं टि्वट केलं.

या तान्हुलीला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं असून तिच्या तब्येतीत सुधारणा झालीये. ही तान्हुली कुणाची आहे याचा पोलीस शोध घेत आहे. तर दुसरीकडे प्रामाणिक माणुसकीचं दर्शन घटवणाऱ्या अमनचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 11:32 PM IST

ताज्या बातम्या