मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कारचा दरवाजा उघडल्याने मागून येणारा दुचारीस्वार दचकला आणि..., बसखाली चिरडून मृत्यू; मुंबईतील LIVE VIDEO

कारचा दरवाजा उघडल्याने मागून येणारा दुचारीस्वार दचकला आणि..., बसखाली चिरडून मृत्यू; मुंबईतील LIVE VIDEO

Mumbai Accident: छोट्याशा चुकीमुळे एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेसाच सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) अंगावर काटा आणणारा आहे.

Mumbai Accident: छोट्याशा चुकीमुळे एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेसाच सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) अंगावर काटा आणणारा आहे.

Mumbai Accident: छोट्याशा चुकीमुळे एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेसाच सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) अंगावर काटा आणणारा आहे.

मुंबई, 10 एप्रिल: छोट्याशा चुकीमुळे एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेसाच सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV VIDEO) अंगावर काटा आणणारा आहे. मुंबईतील बोरिवलीमध्ये ही घटना घडली असून यात 19 वर्षीय अमन यादवचा मृत्यू झाला आहे. अमन काही कामानिमित्त बोरीवली दौलत नगर येथील उत्सव हॉटेल समोरून जात होता त्यावेळी त्याच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या परिसरातील उत्सव हॉटेल समोर काळया रंगाची एक गाडी पार्क होती. या गाडीतील चालकाने अचानक दरवाजा उघडला आणि त्याचवेळी अमन यादव या तरुण मागून दुचाकीवरून येत होता. कारचालकाने दरवाजा उघडल्याने अमन काहीसा दचकला आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. या प्रकारानंतर त्याची गाडी रस्त्यावर घसरली आणि तेव्हाच भरधाव वेगाने येणाऱ्या BEST बसखली अमन चिरडला गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून होटेल उत्सव समोर घडलेल्या प्रकारामुळे बोरिवली परिसरात एकच खळबळ माजली आहे.

(हे वाचा-दीरावर प्रेम जडल्यानंतर पतीचा काढला काटा, कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा केला बनाव)

एकोणीस वर्षीय अमन यादव बोरिवलीमधील आंबा वाडी याठिकाणी राहत होता. तो काही कामानिमित्त दौलत नगर येथील उत्सव हॉटेल समोरून जात होता, त्यावेळी त्याच्यासोबत हा अपघात घडला. अमनचा मृतदेह शताब्दी हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर तो त्याच्या घरच्यांना सोपवण्यात येणार आहे.  अमन यादव याच्या अशा दुर्देवी जाण्याने यादव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाहा व्हिडीओ-

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अशी प्रतिक्रिया समोर येते आहे की, त्या काळ्या रंगाच्या वाहन चालकाने मागे पाहून दरवाजा उघडला असता तर अमनबरोबर हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. मुळात मुंबईसारख्या गजबजलेल्या परिसरात अशा पद्धतीने गाड्या कुठेही रस्त्यावर पार्क करणे लोकांच्या जीवावर बेतू शकते ते अनेकदा अशा घटनांमधून समोर आलं आहे. दुसरी बाब म्हणजे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या BEST  बस चालकाने मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी किंवा गर्दीच्या वेळेस बसच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते.

First published:

Tags: Accident, Mumbai