• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

  • Share this:
28 जून : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी अति तणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी दिली होती. दरम्यान, १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले मुस्तफा डोसा आणि  फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढवण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.पण अशातच  मुस्तफा  डोसाचा मृत्यू झाल्यानं सीबीआयनं या खटल्याची सुनावणी दोन दिवसांसाठी तहकूब करण्याची विनंती कोर्टाला केलीय.
First published: