Home /News /mumbai /

वाढदिवसाची पार्टी करत असताना अचानक बुडाली बोट, मुंबईच्या समुद्राती सुटकेचा थरारक VIDEO

वाढदिवसाची पार्टी करत असताना अचानक बुडाली बोट, मुंबईच्या समुद्राती सुटकेचा थरारक VIDEO

स्थानिक कोळ्यांच्या मदतीनं पर्यटक आणि बोटमधील कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश.

    मुंबई, 07 जानेवारी: गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात रविवारी मोठी दुर्घटना होताना टळली आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. पर्यटकांनी भरलेली बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडायला लागली आणि त्या बोटीतील 50 जणांची सुटका करण्यात यश आलं आहे. ट्रीचा नावाच्या या बोटीवर रविवारी पर्यटक वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. रविवारी गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात पर्यटकांनी बर्थ डे पार्टी करण्यासाठी एक बोट बुक केली. सगळे जणं खूश होते. बर्थ डे पार्टीचा उत्साहा आणि आनंद साजरा केला जात होता. अचानक बोटीमध्ये पाणी घुसलं. काय झालं हे समजेपर्यंत बोटीत पाण्याचा वेग वाढता होता. पर्यटकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. तिथे असलेल्या स्थानिक कोळी बांधवांनी या पर्यटकांना वाचवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोटीमध्ये एकूण 35 पर्यटक आणि 10 बोटीचे कर्मचारी होते. कोळी बांधव नसते तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान या दुर्घटनेची माहिती कोस्टगार्डलाही नव्हती अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेची माहिती कोस्टगार्डला देण्यात आली नव्हती का असा सवालही उपस्थित होत आहे. कोळी बांधव नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. पर्यटकांनी आणि बोटीतील कर्मचाऱ्यांनी कोस्टगार्डचे आभार मानले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Costgard, Gateway of india, Mumbai news, Nevy

    पुढील बातम्या