मुंबई, 25 जून: धावत्या कारने अचानक पेट (Car catches fire in Mumbai) घेतल्याची घटना मुंबई शहरात (Mumbai City) घडली आहे. आलिशान कार म्हणून ओळख असलेल्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. ही घटना मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील (CSMT Railway station) रस्त्यावर घडली आहे. द बर्निंग कारचा थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या आलिशान कारला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. गाडीला आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि तो गाडीतून बाहेर पडला.
अनिल देशमुख अडचणीत; ईडीने बार मालकांचा नोंदवला जबाब, चार कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली
ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. घटनास्थळी तात्काळ वाहतूक पोलिसांनी, अग्निशमन दलाने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत आगीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, आलिशान कारला अचानक आग लागल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.