• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Sanitization drive Dhobi Ghat: मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी, महापौरांनी घेतला मोहिमेचा आढावा

Sanitization drive Dhobi Ghat: मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी, महापौरांनी घेतला मोहिमेचा आढावा

sanitization drive mumbai: मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. धोबीघाट येथून ड्रेन फवारणी मोहीम सुरू केली आहे.

  • Share this:
मुंबई, 06 सप्टेंबर: डेंग्यू - मलेरियाच्या (dengue and malaria) प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेकडून  (BMC)मुंबईत ड्रोनद्वारे डासांसाठी फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. धोबीघाट येथून ड्रोन (Drone) फवारणी मोहीम सुरू केली आहे. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणी मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करताना दाटी वाटीच्या लोकवस्तीत अडचणी येत असतात. त्यामुळे ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने या डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता या परिसरांमध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. महालक्ष्मी धोबी घाट येथे महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मोहिमेचा आढावा घेतलाय. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण आणि पाऊस या संसर्गासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. यावर्षी आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या 1848 रुग्णांची नोंद झाली. हेही वाचा- अहमदनगर हादरलं, एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती काढून टाकली पाहिजेत. साचलेल्या पाण्यात डेंगूच्या आळ्या तयार होत असतात. पालिकेकडून पाणी साचू देऊ नये असं आव्हान केलं जातं आहे. मुंबईत इमारतीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना याठिकाणी पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी साचू देऊ नका, असं आवाहन महानगर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published: