मुंबई,ता.14 जून : मुबंई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी, आता इंग्लिश भाषेला प्रथम भाषेचा दर्जा देण्यात आलांय. तसा प्रस्तावच शिक्षण समितीने मंजूर केलांय. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून महापालिकेच्या शाळेत मराठी सोबतच इंग्लिशही दर्जेदार शिकवलं जाणारेय. पण त्यामुळे रोडावलेली पटसंख्या खरोखर सुधारेल का...? हाच प्रश्नं विचारला जातोय.
निकृष्ट दर्जा आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे महापालिका चालवत असलेल्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खासगी इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा जसं एक कारण आहे, तसंच इथल्या शिक्षणाचा दर्जा आणि सोयीसुविधांचा अभाव हेही त्यातलं महत्वाचं कारण आहे. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक योजना आखलीय. त्याचाच एक भाग म्हणून पहिलीपासून इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देण्यात आलाय...
मुंबईतल्या महापालिका शाळांमधली स्थिती
महापालिका शाळेत इंग्रजीला प्रथम भाषेचा स्थान दिल्यामुळे मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. एकीकडे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात दाखल करतायत, असा दाखला दिला जातोय. शिक्षण मंत्रालयसुद्धा राज्यभरातल्या मराठी माध्यमांकडे वळणाऱ्या मुलांची वाढती आकडेवारी जाहीर करतंय.
भारतात आंबा आणि चिकू थांबवणार बुलेट ट्रेनचा स्पीड !
बेळगावात उद्घाटनाच्या आधी वाहून गेला 5कोटी खर्च करून बांधलेला पूल
तर मुंबईत मात्र मराठीचा टक्का घटत चाललाय. मराठी आणि मराठी माणसाचे ढोल पिटणारी सत्ताधारी शिवसेना मुंबईत इंग्रजी शाळांसाठी गालिचे अंथरतंय...हा प्रयोग यशस्वी होणार का?...यामुळे मराठी शाळा टिकतील का?...भाषेचा दर्जा बदलून गुणवत्ता वाढणार आहे का?.... हा खरा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, English, Marathi, Mumbai, Raj thackery मुंबई, School, Shivsena, Uddhav Thackery, इंग्रजी, उद्धव ठाकरे, मराठी, मराठी भाषा, राज ठाकरे, शाळा, शिवसेना