मुंबई, 17 मे : मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील एका डान्स बारवर छापा मारला आहे. यावेळी एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मॅनेजमेंटमधील 9 जणांसह इतर 6 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. ज्यामध्ये एका महानगरपालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी छापा मारलेला डान्स बार कुलाबा परिसरातील आहे.
पोलिसांच्या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांना नंतर कोर्टातही हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना जामीनावर सोडून दिलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील डान्स बारवरील बंदी उठवण्यात आली आहे. मात्र यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती.
SPECIAL REPORT: दुष्काळाचं भीषण वास्तव, शेतकरी हवालदिल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा