Home /News /mumbai /

Tipu Sultan: राजकारण तापलं; मुंबई अस्थिर करण्याचं काम भाजप करतंय, महापौर किशोरी पेडणेकरांचा घणाघात

Tipu Sultan: राजकारण तापलं; मुंबई अस्थिर करण्याचं काम भाजप करतंय, महापौर किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबईतील मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन निर्माण झालेला वाद सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 27 जानेवारी : मुंबईतील मालाड परिसरातील उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने (BJP) या नावाला विरोध करत आंदोलन सुरू केलं आहे तर काँग्रेस आणि शिवसेनेकडून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुंबईल अशांत करण्याचं काम भाजप करत असून अस्थिर करण्याऐवजी विकासाकडे लक्ष द्या असा टोलाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे. ...म्हणून यांना मुळव्याध सतत सतावतोय का? महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू आहे. ज्या मैदानावर साप म्हणून दोरी आपटतायत... कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत. ज्यांनी ज्यांनी यामध्ये उड्या मारल्या आहेत त्यांनी आधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की, तुमचा विरोध 2019 पासून सुरू झाला आहे का? आत्ताच तुमचा या नावाला विरोध का होतोय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये येत आहेत म्हणून यांना मुळव्याध सतत सतावतोय का? असा प्रश्न पडला आहे." वाचा : राष्ट्रपतींनीच टिपू सुलतानचा गौरवार्थ उल्लेख केला होता हे विसरला का? काँग्रेस नेत्याने भाजपला फटकारले विकास कामांकडे बघा कोरोनाच्या काळात सर्वचजण होरपळून निघाले आहेत. आता सर्वकाही सुरळीत सुरू होत आहे. त्यातच आता एक माजी आमदार म्हणतोय दंगल होणार... कुणाला हवीय दंगल? ज्या मैदानाला नावच दिलेलं नाहीये. त्याचा महापालिका किंवा राज्य सरकारचा काहीही संबंध नाहीये आमच्याकडे तसा प्रस्तावही नाहीये. सतत शिवसेनेला वादात खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा कामात वेळ घालवण्यापेक्षा विकास कामांकडे बघा असा टोलाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे. वाचा : टिपू सुलतान नामांतराला भाजपचा विरोध, मुंबईत प्रचंड गदारोळ, अस्लम शेख यांची पहिली प्रतिक्रिया झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटलं, ज्या मुंबईत दोन रस्त्यांना नावे दिली गेली ती भाजपच्या नेत्यांच्या अध्यक्षतेखाली दिली गेली होती. त्याचा रेकॉर्ड आजही आहे. मग इतकं असतानाही असं का होत आहे. याआधी मुंबईच्या रस्त्यांना टिपू सुलतान यांचं नाव दिलं तेव्हा भाजपने विरोध केला नाही. टिपू सुलतान यांचं नाव 2001 आणि 2013 साली मुंबईत दोन रस्त्यांना दिलं. आता यांचे माजी आमदार दंगल होईल असं म्हणत आहेत. एका नावावरुन इतका मोठा वाद निर्माण करायचा. ज्याला नावच दिलं गेलं नाहीये, मान्यताच दिली गेलेली नाहीये... आमची मागणी आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या. नियम समजून घेत नाहीत. स्थानिक नगरसेवकाला अधिकार आहे की, त्या ठिकाणी काय नाव द्यावं. तेथील नागरिक नाव सुचवतात. त्यामुळे आमची मागणी आहे त्या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या. त्या नावाला सपोर्ट तर करा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव द्या असं म्हणा. पण त्यावर काहीही बोललं जात नाही. एकनाथ खडसे यांच्या पत्रात वीर टीपू सुलतान हे नाव आहे देवेंद्र फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. वाचा : मैदान नामकरणाचा वाद चिघळला, भाजपचे आमदार-खासदार घटनास्थळी, नेमकं काय घडतंय? मुंबईला अस्थिर करण्याचं काम करु नका ज्या प्रकारे मुंबईला अशांत करण्याचं, अस्थिर करण्याचं आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम का सुरू आहे असा प्रश्न आता मुंबईकरांना पडला आहे. मुंबईला अस्थिर करण्याचं काम करु नका. मुंबई शांत आहे. करायचंच असेल तर या मैदानात असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BMC, Kishori pedanekar, Mumbai

    पुढील बातम्या