मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Kishori Pednekar : "दादाकडे बघशील तर...", मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Kishori Pednekar : "दादाकडे बघशील तर...", मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

BMC mayor kishori pednekar receive threat letter: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

BMC mayor kishori pednekar receive threat letter: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

BMC mayor kishori pednekar receive threat letter: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई, 10 डिसेंबर : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आले आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे पत्र मराठीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

हे धमकीचं पत्र आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगत अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे.

महापौर झाल्यापासून दुसऱ्यांदा धमकी

गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे.

वाचा : "शरद पवारांचं ठरलं, 2024 ला सुद्धा हेच सरकार येणार अन् मुख्यमंत्री..."

किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलार वाद

वरळीत झालेल्या सिलेंडर स्फोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात उपचारासाठी दिरंगाई झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच प्रकरणावरुन काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी असा एक शब्द उच्चारला होता ज्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आणि त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यावर गुरुवारी (9 डिसेंबर) आशिष शेलार हे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी आशिष शेलार म्हणाले, मी माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियातही याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मी कुठल्याही व्यक्तीला, महिलेला, महापौरांना उद्देशून किंवा नाव घेऊन ते वाक्य उच्चारलं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश हा अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठी स्वत:च्या अंगावर ओढवून घेण्याचं काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केलं. जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत. जो काही खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत मी जामीन घेतला तसेच हा एफआयआर रद्द केला पाहिजे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

First published:

Tags: Kishori pedanekar, Mumbai