मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai: गोवंडीतील उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध, मात्र पूर्वी भाजपनेच दिला होता होकार : महापौरांनी केली पोलखोल

Mumbai: गोवंडीतील उद्यानाला टिपू सुलतान नाव देण्यास भाजपचा विरोध, मात्र पूर्वी भाजपनेच दिला होता होकार : महापौरांनी केली पोलखोल

Kishori Pednekar: मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या उद्यानाच्या नामकरणावरुन भाजपने शिवसेनेवर आरोप केला. त्याला आता महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Kishori Pednekar: मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या उद्यानाच्या नामकरणावरुन भाजपने शिवसेनेवर आरोप केला. त्याला आता महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Kishori Pednekar: मुंबईतील गोवंडी परिसरात असलेल्या उद्यानाच्या नामकरणावरुन भाजपने शिवसेनेवर आरोप केला. त्याला आता महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    मुंबई, 17 जुलै : मुंबईतील गोवंडी (Govandi) परिसरात असलेल्या उद्यानाच्या नामकरणावरुन (Garden naming ceremony) मोठा वाद रंगला आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रूकसाना सिद्दीकी यांनी या उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर भाजपने याला कडाडून विरोध केला. इतसेच नाही तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या हिंदुत्वावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

    भाजप खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, जेव्हा मी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे ठेवले पाहिजे असा प्रस्ताव दिला होता तेव्हा शिवसेनेच्या खासदाराने या उड्डाणपुलास सूफी संत "सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोइनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी)" असे नाव देण्यास सांगितले होते. आता गोवंडी परिसरातील उद्यानास ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. यातून असे दिसून येते की शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे.

    EXCLUSIVE: राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी

    भाजपने केलेल्या या टीकेनंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, शिवसेनेला भाजप उगाच बदनाम करु पाहत आहे. खरं तर गोवंडीत बाजीप्रभू देशपांडे मार्ग ते रफीक लनाल्यापर्यंतच्या मार्गाला 2013 मध्ये तत्कालीन नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी टिपू सुलतान नाव देण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर 2013 मध्ये या प्रस्तावाला भाजप सदस्याने अनुमोदन देत पाठिंबा सुद्दा दिला होता. टीव्ही 9 ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

    महाविकास आघाडीचा भाग बनल्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध राहिला नाही आहे. यातून शिवसेनेची लाचारी स्पष्टपणे दिसून येते अशी टीकाही भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली होती.

    First published:
    top videos

      Tags: BJP, BMC, Kishori pedanekar