Home /News /mumbai /

वरच्या मजल्यावरुन सळई पडली अन् महिलेच्या छातीत घुसली; मुंबईतील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन वाचवले प्राण

वरच्या मजल्यावरुन सळई पडली अन् महिलेच्या छातीत घुसली; मुंबईतील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन वाचवले प्राण

Mumbai News: एका महिलेच्या छातीतून आरपार गेलेली सळई मुंबई मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन काढली असून महिलेचे प्राण वाचवले आहेत.

मुंबई, 26 जून: मुंबईतील विक्रोळी (Vikroli Mumbai) परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका महिलेच्या शरीरात चक्क दीड फूट लांबीची सळई शिरली. यानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील (Lokmanya Tilak Hospital) डॉक्टरांनी या महिलेवर तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करुन तिचे प्राण वाचवले (doctors remove iron rod from woman chest) आहेत. विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडली. सुमारे दीड फूट लांबीची सळई ही खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचारासाठी दाखल केले. कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; बोगस लस पुरवणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला अटक शीव परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढून सदर महिलेचा जीव वाचविला असून आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमधील 'बेड'वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच सलग तीन तास सुरू होती. महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले. आता सदर दुर्दैवी घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Mumbai

पुढील बातम्या