• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • गेल्या पाच महिन्यात BMC नं बुजवले 31 हजारांहून अधिक खड्डे, आता रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण

गेल्या पाच महिन्यात BMC नं बुजवले 31 हजारांहून अधिक खड्डे, आता रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण

BMC News: मुंबई महापालिकेनं (Mumbai municipal Corporation) गेल्या पाच महिन्यात किती खड्डे (Potholes ) बुजवले यासंदर्भातली माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 सप्टेंबर: मुंबई महापालिकेनं (Mumbai municipal Corporation) गेल्या पाच महिन्यात किती खड्डे (Potholes ) बुजवले यासंदर्भातली माहिती समोर आली आहे. तसंच रस्त्यांच्या धोरणासंदर्भातली जी कार्यवाही सुरु आहे याची माहितीही मिळाली आहे. प्रशासनानं गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत म्हणजेच 9 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीत पालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांवरील एकूण 31 हजार 398 खड्डे बुजवलेत. यासर्वाचं क्षेत्रफळ सुमारे 1 लाख 56 हजार 910 चौरस मीटर इतके आहे. आता पालिका प्रशासनानं मोठ्या रस्त्यांसह 6 मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचंही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण आखलं आहे. त्यासंदर्भातली कार्यवाही पालिकेनं सुरु देखील केली आहे. पालिकेकडून नेहमी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या मार्गी काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात. सध्यपरिस्थितीत पालिकेनं त्वरीत खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं आहे. पालिकेचे कंत्राटदार रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा तयार करण्यात आल्यात. त्यानंतर पालिकेनं यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदारांना द्विवार्षिक स्वरुपाचं कंत्राट देण्यात आलं आहे. Watch Video: पुन्हा एकदा 'लालबागचा राजा'मधील स्थानिक- पोलीस आमनेसामने पालिकेनं यात प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी 2 कोटी रुपयांचं निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीत दीड कोटी रुपये प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आणि उर्वरित 50 लाख रुपये हे खड्डे बुजवण्यासाठी देण्यात आलेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: