मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Pub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा

Pub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली.

    मुंबई, 14 डिसेंबर: विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Coroporation) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सांताक्रूझ वेस्ट मधील बॉम्बे अड्डा नामक पबवर (Bombay Adda pub) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा छापा टाकला. पबमध्ये विना मास्क हुल्लडबाजी करणारे 275 जण आढळून आले. कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सगळ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सगळ्यांना मास्कही दिले. हेही वाचा...मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, 30 फूट खोल खाईत कोसळली 3 वाहनं मिळालेली माहिती अशी की, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली. त्यात बॉम्बे अड्डा या पबचा समावेश आहे. बॉम्बे अड्डा येथे विना मास्क आढळून आलेल्या 275 जणांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दादर येथील एका हॉटेलमध्ये 120 जणांकडून विना मास्कचा दंड वसूल करून त्यांना सगळ्यांना मास्क देण्यात आले. ...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, असं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. मुंबईचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एक इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं. हेही वाचा...प्राध्यापिकेला भररस्त्यावर जाळल्यानं हादरला होता महाराष्ट्र, नेमकं काय घडलं? मुंबई मास्क न वापरणाऱ्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाही. त्यामुळे लोकांनी आता सुधारलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे, असं इक्बालसिह चहल यांनी सांगितलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BMC, Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या