• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 1993 Mumbai blasts verdict : कोर्टाने प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हटलं ?

1993 Mumbai blasts verdict : कोर्टाने प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हटलं ?

993 बॉम्बस्फोटातल्या गँगस्टर अबू सालेम,मुस्तफा डोसा यांच्यावर अखेर आरोप सिद्ध झाले आहेत. तसंच त्यांचे साथीदार असणाऱ्या फिरोज खान,ताहीर मर्चंट,करीमुल्लाह शेख,रशीद खान हेही दोषी ठरलेत.

  • Share this:
16 जून : 1993 बॉम्बस्फोटातल्या गँगस्टर अबू सालेम,मुस्तफा डोसा यांच्यावर अखेर आरोप सिद्ध झाले आहेत. तसंच त्यांचे साथीदार असणाऱ्या फिरोज खान,ताहीर मर्चंट,करीमुल्लाह शेख,रशीद खान हेही दोषी ठरलेत. अब्दुल कय्युम याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आली. गेले 25 वर्ष हा खटला सुरू होता. साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात आरोपींना दोषी ठरवलंय. कोर्टात प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हणालं हे पाठवतो आहे. मुस्तफा डोसा - मोहम्मद डोसा याचा मुंबईत बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात मोठा हात होता. इतर आरोपींसोबत त्यानं मुंबईत बाॅम्बस्फोट घडवण्याचं आणि दहशत माजवण्याचं कटकारस्थान रचलं होतं. बाॅम्बस्फोट होण्यापूर्वी दुबईत जी बैठक झाली होती. त्यात मुस्तफा डोसा, मोहम्मद डोसा, दाऊद इब्राहम यांनी मुंबईत घातपात करण्याविषयी चर्चा केली.  मुंबईत मुस्लिमांवर अत्याचार झाले आहेत, सरकार आपली मदत करत नाही तेव्हा आपण बदला घ्यायला हवा असं त्या बैठकीत ठरवण्यात आलं. मुस्तफा यासाठी दाऊद इब्राहमच्या दुबईतील व्हाईट हाऊस इथं जाऊन आला. मुस्तफानं आपल्या स्मगलिंगचं नेटवर्क वापरुन पाकिस्तानातून आणलेलं आरडीएक्स आणि शस्रास्रं उतरवून घेतलं. त्यानं या सगळ्या प्रकारात ज्यांनी मुंबईत ठिकठिकाणी आरडीएक्स वापरलेले बाॅम्ब ठेवले त्या सगळ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी ने आण करण्याची व्यवस्था केली, त्या सगळ्यांसाठी पासपोर्टची व्यवस्था केली मुस्तफाला टाडा कायदा, शस्रास्र कायदा आणि explosive substances Act, IPC या कायद्यांन्वये दोषी ठरवण्यात आलं आहे अबू सालेम -  बाॅम्बस्फोटातल्या मुख्य कटकारस्थानात सहभागी - मुस्तफा डोसा आणि मोहम्मद डोसा यांच्या  मदतीने मुंबईत शस्रास्रं आणली - पांढऱ्या मारुती शस्रास्रं व्हॅनमधून गुजरातच्या भरुच येथून मुंबईत आणली - यात ९ एके ५६, ८२ हँड ग्रेनेड आणि काही शेकडो काडतुसं होती - मुंबईत त्यानं अभिनेता संजय दत्त, बाबा मूसा आणि झैबुन्निसा काझी यांच्याकडे दिली - संजय दत्तकडून त्यानं पुन्हा दोन एके ५६ ताब्यात घेतल्या आणि काही हँडग्रेनेडही परत नेले - लोकांना घाबरवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी ही शस्रास्रं आणण्यात आली होती - टाडा कायदा, शस्रास्रं कायदा, explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी फिरोज खान - आरडीएक्स आणण्यासाठी आपल्या स्मगलिंगच्या व्यवसायाचा वापर - आरडीएक्स आणि शस्रास्रं उतरवून घेणं आणि ती मुंबईत पोहोचवण्याची व्यवस्था फिरोजनं केली - या सगळ्या प्रकरणात मोहम्मद डोसाशी संपर्कात राहून आरडीएक्स योग्य ठिकाणी पोहोचेल याची व्यवस्था केली - कटकारस्थानाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात उतरविण्यात मोठा सहभाग - आपण कोणतं सामान उतरवत आहोत, या सामानात बंदुका, आरडीएक्स, गोळ्या, हँडग्रेनेड आहे याची पूर्ण जाणीव होती - जाणीवपूर्वक कटात सहभागी - टाडा, Arms act, explosive substances Act, Damage to public property Act यात दोषी मोहम्मद ताहिर - टायगर मेमन, आयुब मेमन यांच्यासोबत कटकारस्थान करण्यात मोठा सहभाग - बाॅम्बस्फोट होण्यापूर्वीच्या दुबईत झालेल्या बैठकीत सहभाग घेत घातपाताचा कट रचला - बाॅम्बस्फोट आणि विध्वंस करण्यासाठी पैशांची तजवीज केली, या खटल्यातील आरोपींना पाकिस्तानात जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, व्हीसा मिळवून देणं, आर्थिक पाठबळ पुरवण्याचे काम केलं - बाॅम्बस्फोटाचं कटकारस्थान रचणाऱ्यांची दुबईत राहण्याची व्यवस्था केली - हेतुपुरस्सर कटात सहभागी - रायगड जिल्ह्यातील शेखाडी इथं आरडीएक्स आणि इतर शस्रास्रं उतरवण्याची व्यवस्था केली - TATA, Arms Act, Explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी करिमुल्ला शेख - मुंबईत दंगली सुरू असताना टायगर मेमनने करिमुल्लाला मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्याचा बदला आपण सरकारकडून आणि हिंदूंकडून घेतला पाहिजे असं सांगितलं. त्यानुसार पुढे करण्यात आलेल्या कटकारस्थानात करिमुल्ला सहभागी झाला - त्यानं रायगड जिल्ह्यातील शेखाडी इथं शस्रास्रं उतरवून घेण्यात मोठी भूमिका बजावली - आपण उतरवत असलेलं सामान काय आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती - अलिबाग इथे स्फोटापूर्वी झालेल्या बैठकीत टायगर मेमनसह सहभागी - काही जणांना स्फोट करण्यासाठी तयारीसाठी पाकिस्तानला पाठवलं - कटकारस्थानाची पूर्ण पूर्वकल्पना होती - TATA, Arms Act, Explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी रियाझ सिद्दकी - टाडा कायद्याअंतर्गत दोषी - मुंबईत मारुती व्हॅनमध्ये शस्रास्रं आणि आरडीएक्सची ने आण केली, हीच व्हॅन नंतर स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात आली अब्दुल कय्यूम - निर्दोष मुक्तता
First published: