Home /News /mumbai /

SPECIAL: मुंबई अंधारात का बुडाली? पॉवर ग्रीड स्टेशनमध्ये नेमकं काय झालं? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

SPECIAL: मुंबई अंधारात का बुडाली? पॉवर ग्रीड स्टेशनमध्ये नेमकं काय झालं? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबई 12 ऑक्टोबर: सोमवारी अचानक मुंबई आणि परिसर वीज गेल्याने अंधारात बुडून गेला. देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे शहर काही तास अंधारात बुडून गेलं होतं. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे जागीच थांबल्या. हॉस्पिटलच्या कामात अडथळे आलेत. अचाक वीज जाण्याची ही घटना मोठी असल्याने आता त्याची चर्चा सुरू झाली आहे. पॉवर ग्रीडमध्ये नेमकं काय झालं? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र पुरेशा तयारीचा अभाव आणि नेमकं काय होऊ शकते याचा अंदाज न आल्याने वीज गेल्याची माहिती आता पुढे येत आहे. कळवा तळेगाव पॉवर ग्रीड लाईन 10 तारखेपासूनच अंडर ब्रेक डाऊन झाली होती. अशातच पहाटे साडेचार वाजता कळवा पडघा ही लाईनही ट्रीप झाली. त्यामुळे इतर वाहिन्यांवर प्रचंड ताण आला. या तांत्रिक बिघाडाची दुरूस्ती सुरू असताना पर्यायी व्यवस्था का निर्माण केली गेली नाही हा मुख्य प्रश्न असून त्याचं उत्तर दिल्या गेलेलं नाही. सकाळी नेमकं काय झालं? 10 ऑक्टोबर पासूनच कळवा-तळेगाव पॉवर ग्रीड ही ब्रेकडाउन होती. सोमवार सकाळी 4.33 वाजता कळवा पडघा ही लाईन ट्रिप झाली. त्यानंतर कळवा पडघा ही लाईन 10.1 वाजता कोलमडून गेली. दसरा दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! सरकार विनाव्याज देणार 10000 तळेगाव-खारघर ही लाईन 0.02 वाजता ट्रिप झाली. तर पालघर ग्रीडच्या 3 लाईन्स 10.5 वाजता ट्रिप झाल्यात. तळेगाव--खारघर या ग्रीड मध्ये तर शॉर्ट सर्किट सारख्या ठिणग्या उडत होत्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मुंबईत बत्ती गुल झाली. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसंच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार विवेक ऑबरॉय स्टारर मोदींचा बायोपिक मुंबई आणि ठाणे उपनगरात सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला होता. अखेर अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून पुन्हा अशा घटना घडू नयेत असे निर्देश दिलेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या