शिवसेनेची झोप उडवणारी बातमी; 56 पैकी 45 आमदार भाजपच्या संपर्कात!

राज्यातील सत्तास्थापनेत कोणाला किती वाटा मिळणार यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरु झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 04:03 PM IST

शिवसेनेची झोप उडवणारी बातमी; 56 पैकी 45 आमदार भाजपच्या संपर्कात!

मुंबई, 29 ऑक्टोबर: राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला आहे. पण असे असले तरी प्रत्यक्षात महायुतीमध्ये आता सत्तेवरून जुंपली आहे. राज्यातील सत्तास्थापनेत कोणाला किती वाटा मिळणार यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरु झाले आहे. अशातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या तब्बल 45 आमदारांना भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करण्यास उत्सुक आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताा काकडे यांनी हा दावा केला आहे.

यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने देखील दिले आहे. काकडे म्हणतात, शिवसेनेच्या 56 पैकी 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे सर्व आमदार आम्हाला (भाजपला) फोन करत आहेत आणि सरकारमध्ये सहभागी होण्याबद्दल इच्छा व्यक्त करत आहेत. या सर्व आमदारांचे असे म्हणणे आहे की, काहीही झाले तरी शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी झाले पाहिजे. शिवसेनेच्या 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावी असे म्हटल्याचे काकडे यांनी सांगितले. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु होण्याआधीच वाद सुरु झाला आहे. निकालात 2014च्या तुलनेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी झाल्याने शिवसेनेने सत्तेत बरोबरीचा वाटा मागितला आहे.

शिवसेनेने भाजपकडून यासंदर्भात लेखी आश्वासन मागितले आहे. याआधी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने विधानसभेसाठी फॉर्म्य़ुला निश्चित केला होता. आता शिवसेनेने भाजपकडे पुन्हा तिच मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...