भाजप उमेदवाराकडे 500 कोटींची संपत्ती, टॉप कारसह मुंबईत 5 आलीशान फ्लॅट!

भाजप उमेदवाराकडे  500 कोटींची संपत्ती, टॉप कारसह मुंबईत 5 आलीशान फ्लॅट!

दक्षिण मुंबईतील सगळ्यात पॉश अशा मलबार हिल विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार असलेले लोढा हे सलग सहाव्या वेळेस निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस राहिला असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. अशात देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) चे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019)मध्ये ते मलबार हिल (Malabar Hill) या जागेचे उमेदवार आहेत.

दक्षिण मुंबईतील सगळ्यात पॉश अशा मलबार हिल विधानसभा मतदारसंघात पाच वेळा आमदार असलेले लोढा हे सलग सहाव्या वेळेस निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहेत. लोढा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे 252 कोटींपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता आणि सुमारे 189 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे.

इतर बातम्या- पीयूष गोयल यांच्या मुंबईतील घरी चोरी, महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय!

रिअल इस्टेट व्यवसायात लोढा यांचे कुटुंब

या आमदाराकडे 14 लाख रुपयांची जग्वार कार असून बॉन्ड आणि शेअर्समध्ये अन्य गुंतवणूक आहे. लोढा यांचे कुटुंबीय रिअल इस्टेट व्यवसायात असून दक्षिण मुंबईत त्यांचे पाच फ्लॅट आहेत. राजस्थानातही त्यांचा प्लॉट आहे. लोढा आणि त्यांची पत्नी यांचेही मलबार हिल भागात घर आहे.

इतर बातम्या - राज ठाकरेंना धक्का, मनसेचं तिकीट नाकारून नेत्याने बांधलं शिवबंधन

लोढा यांच्यावर पाच फौजदारी गुन्हे दाखल

लोढा यांच्या पत्नीचा दक्षिण मुंबईत आणखी एक फ्लॅट आणि व्यावसायिक मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, लोढा यांच्यावर पाच फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असून 2 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

इतर बातम्या - पक्षानिष्ठेची एैशी-तैशी, तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात घरवापसी!

10 वर्षांपूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकीत स्थावर 24 आणि जंगम 24 अशी 68 कोटींची मालमत्ता आणि 7 कोटींचं कर्ज असल्याचं लोढा यांनी सांगितलं होतं. 2014च्या निवडणुकीत त्यांनी 200 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. लोढा यांच्या राहत्या घराची किंमत 44 कोटी 49 लाख आहे. तर त्यांच्या एका घराची किंमत ही 9 कोटी 73 लाख रुपये आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 3, 2019, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading