'राज ठाकरेंनी 'चला हवा येऊ द्या' बघत आपला वेळ घालवावा'

'राज ठाकरेंनी 'चला हवा येऊ द्या' बघत आपला वेळ घालवावा'

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून हल्ला चढवला. त्यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जानेवारी : 'राज ठाकरेंना नरेंद्र मोदींसारख्या नेत्यांची मुलाखत समजणं थोडं अवघडंच असणार, वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही,' असं म्हणत भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून हल्ला चढवला. त्यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

'लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी”पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात,त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष !आणि शेवटी मी !!अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!!' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

काय होतं राज ठाकरे यांचं व्यंगचित्र?

नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटलं आहे. मुलाखतीत मोदींना विचारण्यात आलेले प्रश्न पूर्वनियोजित असल्याचं राज ठाकरेंनी दाखवलं.

[caption id="attachment_328211" align="alignnone" width="1355"]नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटलं आहे. मुलाखतीत मोदींना विचारण्यात आलेले प्रश्न पूर्वनियोजित असल्याचं राज ठाकरेंनी दाखवलं. नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटलं आहे. मुलाखतीत मोदींना विचारण्यात आलेले प्रश्न पूर्वनियोजित असल्याचं राज ठाकरेंनी दाखवलं.

राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नरेंद्र मोदी हेच राज यांचे टार्गेट राहिले आहे.

धक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...

First published: January 3, 2019, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading