आज मुंबईत केवळ 37 केंद्रांवरच लस उपलब्ध, खोळंबा टाळण्यासाठी वाचा कुठे मिळेल Vaccine

आज मुंबईत केवळ 37 केंद्रांवरच लस उपलब्ध, खोळंबा टाळण्यासाठी वाचा कुठे मिळेल Vaccine

Vaccine Shortage in Mumbai: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढते संक्रमण (Second Wave of Coronavirus) आणि अत्यावश्यक बाबींचा तुटवडा या दोन महत्त्वाच्या समस्यांशी आज संपूर्ण देश लढा देत आहे. मुंबईतही (Mumbai Corona Situation) परिस्थिती वेगळी नाही

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढते संक्रमण (Second Wave of Coronavirus)  आणि अत्यावश्यक बाबींचा तुटवडा या दोन महत्त्वाच्या समस्यांशी आज संपूर्ण देश लढा देत आहे. मुंबईतही (Mumbai Corona Situation) परिस्थिती वेगळी नाही आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही लसीकरणासाठी अनेक केंद्रावर (Vaccine Shortage at Mumbai) लसच उपलब्ध नाही आहे. मुंबई महापालिकेने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार आज केवळ 37 केंद्रावरच लस उपलब्ध आहे, यापैकी 30 महापालिकेची तर 7 खाजगी लसीकरण केंद्र आहेत. त्यामुळे पालिकेकडून असं आवाहन करण्यात आलं आहे की, खोळंबा आणि गर्दी टाळण्यासाठी लस उपलब्ध असणाऱ्या केंद्रांच्या माहितीनुसारच तुमची लस घेण्यासाठी जाण्याची योजना आखा.

मुंबईत आज पुन्हा एकदा लशींचा तुटवडा असल्यामुळे केवळ 37 केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या 59 केंद्रांपैकी केवळ 30 केंद्रांवर तर खाजगी रुग्णालयाच्या 73 पैकी केवळ सात केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या केंद्रांची यादी लक्षात घेऊनच मग लसीकरणासाठी घराबाहेर पडावे अशी विनंती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. लस उपलब्ध नसलेल्या यादीत मुंबई महानगरपालिकेच्या बहुतेक मोठ्या केंद्रांचा समावेश आहे. बीकेसी कोव्हिड सेंटर, नेस्क कोव्हिड सेंटर, माहीम मेटरनिटी होम, हिंदुजा हॉस्पिटल अशी मोठी केंद्रे देखील आज बंद आहेत.

(हे वाचा-Bank Holidays: मे महिन्यात 5 दिवस बँका बंद; कोरोनामुळे बसणार दुहेरी फटका)

पालिकेने जारी केलेल्या या पत्रकात असे देखील नमुद करण्यात आले आहे की, 25 एप्रिल 2021 रोजी पहिल्या सत्रात अथवा सदर लसीकरण केंद्रात लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या डोसचे लाभार्थी आणि प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लस देण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या केंद्रांवर लस उपलब्ध आहे.

लस उपलब्ध असणाऱ्या केंद्रांयीच विभागनिहाय यादी

सार्वजनिक रुग्णालयं

1. ई-  जे. जे. रूग्णालय, भायखळा

2. ई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रूग्णालय, भायखळा

3. ई- कस्तुरबा रूग्णालय, चिंचपोकळी

4. एफ/दक्षिण- केईएम रूग्णालय, परळ

5. एफ/दक्षिण- टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ

6. एफ/उत्तर- मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा

7. एफ/उत्तर- अकवर्थ रुग्णालय, वडाळा

8. जी/दक्षिण- वरळी कोळीवाडा आरोग्य केंद्र, वरळी

9. जी/ दक्षिण- ईएसआयएस रुग्णालय, वरळी

10. एच/पूर्व- व्ही.एन.देसाई रूग्णालय, सांताक्रूझ

11. एच/पश्चिम- भाभा रूग्णालय, वांद्रे

(हे वाचा-दुसऱ्या लाटेत झोपट्टीपेक्षा मध्यमवर्गीयांमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक, हे आहे कारण)

12. के/पूर्व- शिरोडकर प्रसुतीगृह, विलेपार्ले

13. के/पूर्व- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी

14. के/ पश्चिम- कुपर रूग्णालय, जुहू

15. पी/ दक्षिण- टोपीवाला दवाखाना,गोरेगाव

16. पी/ दक्षिण- गोकूळधाम प्रसृतिगृह, गोरेगाव

17. पी/ दक्षिण- मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव

18. पी/ उत्तर- स.का. पाटील रूग्णालय, मालाड

19. पी/उत्तर- मालवणी सरकारी रूग्णालय, मालाड

20. पी/उत्तर- चौकसी प्रसुतिगृह, मालाड

21. पी/उत्तर- आप्पापाडा प्रसुतिगृह, मालाड

22. आर/दक्षिण- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कांदिवली

23. आर/दक्षिण- चारकोप विभाग १ दवाखाना, कांदिवली

24.आर/ दक्षिण- आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली

25.आर/ दक्षिण-  इएसआयएस रूग्णालय, कांदिवली

26. आर/ मध्य- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रूग्णालय, बोरिवली

27. एम/ पूर्व- शताब्दी रूग्णालय, गोवंडी

28. एम/ पश्चिम- माँ रूग्णालय, चेंबुर

29. एस- लालबहादूर शास्त्री प्रसुतिगृह, भांडूप

30. एस- क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले जनरल रुग्णालय, विक्रोळी

(हे वाचा-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! COVID-19 मुळे शिवसेनेच्या नगरसेविकेचा मृत्यू)

खाजगी रुग्णालयं

1 . सी- मित्तल रुग्णालय, चर्नी रोड

2. के/पूर्व- क्रिटीकेअर रुग्णालय, अंधेरी

3. पी/उत्तर- तुंगा रुग्णालय, मालाड

4. पी/उत्तर- लाईफ लाईन मल्टीस्पेशलिस्ट रुग्णालय, मालाड

5. आर/दक्षिण- शिवम रूग्णालय, कांदिवली

6. एल विभाग- कोहिनूर रुग्णालय, कुर्ला

7. एम/पश्चिम-  ईनलॅक्स् रुग्णालय, चेंबूर

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 25, 2021, 8:58 AM IST

ताज्या बातम्या