Home /News /mumbai /

मुंबईकरांनो, हेल्मेटधारी गँगपासून सावध राहा, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

मुंबईकरांनो, हेल्मेटधारी गँगपासून सावध राहा, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!

फक्त चोरीच केली नाही तर त्या वृद्ध महिलेनं चोरांना विरोध केला म्हणून चोरांनी त्यांच्या हातातील चाकूने वृद्ध महिलेला जखमी केलं

 मुंबई, 06 मार्च : मुंबईत हेल्मेटधारी चोरांनी ऊत आणलाय. या हेल्मेटधारी चोरांच्या टार्गेटवर असतात वृद्ध महिला. ज्या घरात वृद्ध महिला एकट्याच राहतात किंवा एकट्या आहेत अशा वृद्ध महिलांना घरात घुसून लुटायचे फक्त लुटायचे नाही तर त्यांना मारहाण करुन गंभीर जखमी करायचे अशी जीवघेणी चोरीची पद्धत या हेल्मेटधारी गॅंगची आहे. मुंबईतील कोकण नगर जोगेश्वरी पुर्व इथं एकटी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात अचानक ३ हेल्मेटधारी चोर शिरले आणि महिलेला काही कळायच्या आतच तिच्या गळ्यावर चाकू ठेवून तिच्या गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची चैन आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेऊन फरार झाले. फक्त चोरीच केली नाही तर त्या वृद्ध महिलेनं चोरांना विरोध केला म्हणून चोरांनी त्यांच्या हातातील चाकूने वृद्ध महिलेला जखमी केलं आणि बेदम मारहाण देखील केली ज्यात वृद्ध महिला जखमी झाली. ही हेल्मेटधारी टोळी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे. कोणत्या भागांत वृद्ध महिला पुरुष एकटे राहतात, ज्यांना लूटल्यावर मोठी कमाई होवू शकते, याची पहिले रेकी करतात आणि वेळ बघून चेहरा लपवण्याकरता हेल्मेट घालून घरात शिरुन वृद्धांना मारहाण करुन जखमी करतात. हेल्मेट घालून या चोरांनी याआधी मुंबई उपनगरात अनेक वृद्धांना लूटलंय यांची ही मोठी टोळी असून यांतील एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वृद्धांवर हल्ल्याचे पुन्हा प्रमाण वाढत चाललंय. गेल्या दोन आठवड्यात अनोळखी व्यक्तींकडून जवळपास ५-६ वृद्धांवर हल्ला करुन त्यांना लुटण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी हेल्मेट धारी टोळीच्या एका चोराला अटक केली आहे. ज्याच्या दुसऱ्या साथीदाराला असाच एका प्रकरणात नुकतीच अटक झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. याचाच अर्थ अटक होऊन तुरुंगवारी करुन पुन्हा बाहेर आल्यावर हे चोर पुन्हा वृद्धांना लूटतात म्हणजेच या हेल्मेटधारी चोरांनी कायद्याचा धाक उरलाच नाही हे स्पष्ट होतंय. गाडीच्या  वादा वरून मुलाने केली बापाची हत्या दरम्यान, एका दुचाकीसाठी मुलाने आपल्याच जन्मदात्या बापाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची संतापजनक घटना भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली.  वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला एकच खळबळ उडाली होती. ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असं मृत वडिलांचे नाव आहे. ताराचंद आणि त्यांचा मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होता. गुरुवारी दुपारी लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आले. येताच त्याने वडील ताराचंद यांना 'माझ्या दुचाकीची चाबी दे', असं म्हटलं.  मुलांचा अवतार पाहून वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरू केले. आपलाच मुलगा आपल्याशी भांडत असल्यामुळे ताराचंद यांचा पार चढला आणि त्यांनी अंगणात पडलेल्या काठीने लोकेशला अंगणात मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने त्यांच्या हातातून काठी घेऊन ताराचंद यांच्या डोक्यावर प्रहार केले.  क्षणात ताराचंद हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुलं असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या ताराचंदला पाहून प्रत्येक जण हळहळत व्यक्त  करत होता. तर हत्या केल्यानंतर आरोपी लोकेशने स्वत: लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर हजर झाला. आणि आपण वडिलांचा खून केला असल्याची कबुली दिला. पोलिसांनी तातडीने लोकेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. परंतु, अत्यंत किरकोळ कारणावरून मुलानेच बापाची हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या