बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात मनसेची उडी, राज ठाकरेंकडे मांडली व्यथा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात मनसेची उडी, राज ठाकरेंकडे मांडली व्यथा

गेल्या तीन दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. अखरे आज तिसऱ्या दिवशी त्यांनी राज ठाकरेंकडे त्यांची व्यथा मांडली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : गेल्या तीन दिवसांपासून बेस्टचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. अखरे आज तिसऱ्या दिवशी त्यांनी राज ठाकरेंकडे त्यांची व्यथा मांडली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोचलं आहे. यावेळी बेस्ट कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीदेखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्या होत्या. राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनी आता राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.

मनसेने बेस्टच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यावेळी 'संप मिटवण्यासाठी बेस्ट स्थानकात आरती करावी' अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली होती. तसंच पालिका आयुक्तांना बेस्ट बस एमएमआरडीएच्या घशात घालायची आहे आणि याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप मनसेनं केला होता.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बंद आहेत. बुधवारी दिवसभर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बेस्ट कर्चमाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठका होत राहिल्या मात्र त्यात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीदेखील मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बस धावणार नाहीत.

तोडगा काढण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. आज उद्धव ठाकरे संपासंदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांना काय आश्वासन देणार आणि संपावर कशा प्रकारे तोडगा काढणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

तर एकीकडे, बेस्ट कामगार संघटनेचे सचिव शशांक राव यांनी बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. तसंच मुख्य तीन मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवला.

'मेस्मा' कायद्यांतंर्गत कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घरे रिकामी करण्याच्या नोटिसा धाडण्यामुळं बेस्ट कर्मचाऱ्यांमधील रोष कमालीचा वाढला आहे. नोटीस बजावण्याच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी भोईवाडा वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय वडाळा आगारावर मोर्चा नेणार आहेत.

VIDEO : ..जेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर येतात

 

First published: January 10, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading