मुंबईकरांची बेस्ट 7व्या दिवशीही रुसलेलीच, हायकोर्टात तरी तोडगा निघणार का?

मुंबईकरांची बेस्ट 7व्या दिवशीही रुसलेलीच, हायकोर्टात तरी तोडगा निघणार का?

'आमच्या कोणत्याही मागण्या अवाजवी नाहीत, तुम्ही आम्हाला किमान जगण्यासाठीच्या मागण्या मागतो आहोत'

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : सलग सातव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच संप सात दिवसांपर्यंत लांबला आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती आज हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे. त्यामुळं आज तरी बेस्ट संपावर तोडगा निघतो का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी अखेर मौन सौडलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवाजवी असल्याचा सूर शिवसेना पक्षप्रमुखांनी आळवला आहे. मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असा शब्ददेखील त्यांनी दिला आहे.

बेस्टच्या अर्थसंकल्पाचं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. दरम्यान ज्यांचा बेस्ट संपाशी संबंध नाही त्यांनी यात पडू नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

VIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे

'आमच्या कोणत्याही मागण्या अवाजवी नाहीत, तुम्ही आम्हाला किमान जगण्यासाठीच्या मागण्या मागतो आहोत' असं प्रत्युत्तर बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

तर एकीकडे बेस्ट संपावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही. त्यामुळे सरकाराल धडा शिकवण्यासाठी मनसैनिकांनी तयार राहण्याचं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

बेस्टच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहेत. हे फक्त सिनेमा प्रदर्शित करतायत यापेक्षा दुसरं काहीही त्यांना महत्वाचं वाटत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या सगळ्या राजकाराणात मात्र हाल झाले ते सर्वसामान्यांचे. त्यातही काही रिक्षाचालक बेस्टच्या संपाचा गैरफायदा घेतानाही दिसून आले. कुर्ल्यामध्ये लायसन नसतानाही काही रिक्षाचालक रिक्षा चालवताना आढळून आले. वाहतूक पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे लायसन्स आणि गाडीची काहीच कागदपत्र मिळाली नाहीत. त्यामुळे आता संप कधी संपणार असाच प्रश्न समोर येतोय.

विजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर

 

First published: January 14, 2019, 7:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading